मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे या परीक्षेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र ठराविक अशी दिनांक यावेळी देण्यात आले नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवालदेखील यावेळी उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात महत्त्वाची घोषणा ट्विट करुन केली आहे. की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षा कधी घ्यायची आहे त्यासंदर्भात तारीख ठरविण्यात येणार आहे.