Thursday, October 23, 2025
Happy Diwali

किशोर सावंत यांच्यावर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया

किशोर सावंत यांच्यावर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : कणकवली येथील किशोर सावंत यांच्यावर जसलोक रुग्णालयात मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मदतीमुळे तसेच भाजप पदाधिकारी नामदेव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे किशोर सावंत यांच्यावर तातडीने उपचार झाले. याबद्दल सावंत यांनी राणे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

५४ वर्षीय किशोर सावंत हे मूळचे पिसेकामते, ब्राम्हणवाडी येथील रहिवासी आहेत. मुंबईत मालाड येथे त्यांचे वास्तव्य आहे. सावंत यांना हृदयविकाराचा त्रास उद्भवला. त्यानंतर सावंत यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यासाठी जवळपास ४ ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. राणे कुटुंबीयांच्या मदतीमुळे तसेच नामदेव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया शक्य झाली. सावंत यांची प्रकृती आता ठिक आहे.

किशोर सावंत हे गेली २५-३० वर्ष भाजपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांनी पक्षांतर्गत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. एक प्रामाणिक व नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सावंत यांना तातडीने वैद्यकीय आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल नामदेव चव्हाण यांचे कौतुक होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >