Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमी‘हुनर हाट’चे आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

‘हुनर हाट’चे आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या प्रत्येक भागात ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव देणाऱ्या, कौशल्य कुबेरांच्या ‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (१७ एप्रिल) सकाळी ११.३० वा. होणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी ही माहिती दिली.

‘हुनर हाट’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेशीतून स्वावलंबन’ या संकल्पनांचा सशक्त, प्रभावी प्रकल्प म्हणून सिद्ध होतो आहे, असे नक्वी यांनी सांगितले.

४०वा ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला शनिवारपासून वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) सुरुवात झाली आहे. २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपूर, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रांतून नावाजलेले कारागीर हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.

‘हुनर हाट’च्या उपहारगृहात (फूड कोर्ट) इथे येणारे लोक देशाच्या विविध भागांतील पारंपरिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.

१२ दिवस चालणाऱ्या मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना प्रसिद्ध कलाकारांच्या विविध गीत – संगीताच्या भव्य कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -