Monday, March 17, 2025
Homeक्रीडाआयपीएलचा ‘स्ट्राइक रेट’ घसरला

आयपीएलचा ‘स्ट्राइक रेट’ घसरला

टीआरपी पुन्हा आपटला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२२ स्पर्धेचे रेटिंग सलग दुसऱ्या आठवड्यात घसरले आहे. आयपीएलच्या लाइव्ह सामन्यात मागच्या आठवड्यात ३३ टक्के घसरण पहायला मिळाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुसऱ्या आठवड्यात २८ टक्के घट झाली आहे.

आयपीएलशी संबंधित काही जाहिरात कंपन्यांनी २०२२च्या ऑन एअर कामगिरीवर नापसंती व्यक्त केली. जाहिरातदार कंपन्यांचे मत असे की, यंदा आयपीएलचे रेटिंग आमच्या अपेक्षेनुसार आलेले नाही. दिवसेंदिवस यात घसरण होत आहे. याआधी आयपीएलचे रेटिंग असे कधीही घसरले नव्हते. यंदा २० ते ३० टक्के घटले आहे.

आम्ही मागच्या दरांच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक रक्कम मोजली आहे. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खरे तर रेटिंग रेकॉर्डब्रेक व्हायला हवे. तथापि, यंदा असे काहीही घडलेले नाही. सन टिव्ही नंबर वन असून एमएए टिव्ही दुसऱ्या, तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क लोकप्रियतेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -