इगतपुरी : माणिक खांबजवळ ग्रामीण पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन एक गंभीर, तर दहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर आज २ अपघात झाले. हा अपघात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिक खांबजवळील वळणावर झाला. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांच्या व्हॅनला अपघात झाला.
या अपघातात एकजण गंभीर, तर दहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पहिला अपघात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिक खांब शिवारात वळणावर झाला.
हिरव्या मिरचीने भरलेला ट्रक क्रमांक जीजे २७ टीटी ८६८५च्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडर तोडून मध्यभागी उलटला. हा ट्रक काढत असताना ग्रामीण पोलिसांचे वाहन अपघातग्रस्त झाले. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक एक लेनने संथगतीने सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकला बाजू करण्याचे काम सुरू केले त्यामुळे काही काळानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.