Tuesday, April 29, 2025
Homeकोकणरायगडचार फाट्यावरील पथदिवे महिनाभरापासून बंद

चार फाट्यावरील पथदिवे महिनाभरापासून बंद

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, बसवण्याची घाई मात्र देखभालीकडे कानाडोळा

ज्योती जाधव

कर्जत : कर्जत तालुक्यात येणाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा. या चारफाटा रस्त्यावरून प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यासाठी पथदिवे (स्ट्रीट लाईट) बसवण्यात आले. मात्र गेले महिनाभरापासून स्ट्रीट लाईट बंद आहे. तरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राकेश देशमुख यांचे म्हणणे आहे.

कर्जत चारफाटा येथील मधोमध असलेल्या पोलवरील स्ट्रीट लाईट महिनाभरापासून बंद आहेत. कोणात्याही अधिकाऱ्याला अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गोष्टीचे लक्ष नसून गांभीर्य दिसून येत नाही. जिथे सतत वाहनांची वर्दळ असते अशा ठिकांणाची पुरेसा प्रकाश नसणे ही चिंतेची बाब आहे.

भविष्यात रात्री-अपरात्री एखादी अनुचित घटना घडली आणि सदर घटनेचे चित्रण सी सी टीव्हीत दिसले नाही, तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदर विषयीचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाने लवकरात लवकर स्ट्रीट लाईट पूर्ववत करावे, अशी मागणी राकेश देशमुख यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे शनिवार-रविवार या वीकेंडला मुंबई-पुण्यावरून पर्यटक फार्महाऊस, रिसॉर्टला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. याच दरम्यान काही घटना घडले याला जबाबदार कोण असणार, असा प्रश्न भिसेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -