Sunday, July 21, 2024
Homeक्रीडारूटचा इंग्लंडच्या कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा

रूटचा इंग्लंडच्या कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा

लंडन (वृत्तसंस्था) : इंग्लंडचा अनुभवी क्रिकेटपटू ज्यो रूटने कसोटी कर्णधार राजीनामा दिला आहे. त्याने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. रूट हा २०१७ पासून इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद रूट सांभाळत होता. अॅलिस्टर कुकनंतर त्याच्याकडे नेतृत्व आले. त्याने ती जबाबदारी समर्थपणे पेलली. पण गेल्या वर्षी रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला अॅशेस मालिकेत ०-४ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर रूटवर मोठी टीका झाली.

अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे इंग्लंडचा संघ दमदार पुनरागमन करेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. पण तेथेही संघाला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. शिवाय अॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळली. त्यात भारतीय संघाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर २-१ अशी आघाडी घेतली होती. या साऱ्या घटनांचा विचार करता जो रूटने पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

रूटच्या नेतृत्वाखाली ६४ पैकी २७ सामन्यांत विजय

ज्यो रूटने २०१७ पासून आतापर्यंत ६४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. त्यात संघाने २७ सामने जिंकले तर २६ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच्या नेतृत्वाखालील विजयाची टक्केवारी ४२.१८ इतकी आहे. कर्णधारपद भूषवत असताना रूटने ४७ च्या सरासरीने ५,२९५ धावा केल्या. त्यात १४ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -