Wednesday, May 28, 2025

देशमहत्वाची बातमी

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये १०८ फूट उंच हनुमान मूर्तीचे अनावरण

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये १०८ फूट उंच हनुमान मूर्तीचे अनावरण

नवी दिल्ली : देशात आज हनुमान जयंतीचा उत्साह सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या १०८ फूट मूर्तीचे अनावरण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पवनपुत्राचे आशीर्वाद सर्वांवर असोत, असे पंतप्रधान म्हणाले.


पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी यांचे चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना बसवण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात याची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिमेला स्थापित केलेला हा पुतळा आहे. या मालिकेतील पहिला पुतळा २०१० मध्ये शिमल्यात बसवण्यात आला आहे. तर दक्षिणेकडील रामेश्वरम येथे मूर्तिकाम सुरू करण्यात आले आहे.


मोरबीमध्ये २०१८ मध्ये भव्य मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. त्याची किंमत १० कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

Comments
Add Comment