Tuesday, January 21, 2025
Homeमहामुंबईराणी बागेतील प्राण्यांचे आधुनिक प्रदर्शन कक्ष आणि उद्यान

राणी बागेतील प्राण्यांचे आधुनिक प्रदर्शन कक्ष आणि उद्यान

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ येथे प्राण्यांचे आधुनिक प्रदर्शन कक्ष, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ‘बायोम थीम’वर आधारित उद्यान आणि सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया संयंत्र यांचे लोकार्पण शनिवार, दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बृहत् (मांडणी) आराखड्यामध्ये दोन नवीन भूखंडांचा समावेश करून व इतर सुधारणांसह सुधारित बृहत् (मांडणी) आराखड्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (नवी दिल्ली) यांची अंतिम मंजुरी प्राप्त झाली होती. त्यानुसार महानगरपालिकेने या उद्यानामध्ये विविध लोकोपयोगी मनोरंजनाची साधने विकसित केली आहेत.

पक्ष्यांचे नंदनवन

नवीन तयार करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या नंदनवनात वॉक थ्रू सुविधेसह तयार करण्यात आलेली प्रदर्शनी अत्यंत भव्य आहे. काचेच्या प्रदर्शन गॅलरीमधून आतील तयार करण्यात आलेले नैसर्गिक अधिवास, पक्ष्यांकरिता विविध झाडे-झुडपे, घरटी तयार करण्याच्या जागा, खेळणी, पाणी पिण्याच्या सुविधा इत्यादी पाहता येतात. युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित स्टेनलेस स्टील वायरमेशची संरचना प्रदर्शनीच्या आच्छादनासाठी उभारण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पाणपक्षी प्रदर्शित करण्यात आले आहेत. पक्ष्यांविषयीची रंजक आणि जीवशास्त्रीय माहिती देणाऱ्या बाबी समाविष्ट असलेले फलक प्रदर्शनीमध्ये लावण्यात आले आहेत.

माकड प्रदर्शनी

माकडांकरिता तयार करण्यात आलेले आवासस्थान अत्यंत भव्य आहे. प्रदर्शन गॅलरीमधून आतील भागात तयार करण्यात आलेले कृत्रिम निवास, आकर्षक संरचना, झोपाळे इत्यादी सुविधांचा आनंद घेताना माकडे पाहण्यास मिळतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -