
मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल २०२२च्या सॅटर्डे स्पेशल सामन्यांतील दुसऱ्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची गाठ बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सशी पडेल. या लढतीत बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंगळूरुने ५ पैकी ३ सामने जिंकताना ६ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहावे स्थान मिळवले आहे. अपयशी सुरुवातीनंतर सलग तीन विजय नोंदवले तरी गतविजेता चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध विजयाची मालिका संपुष्टात आली. दिल्लीने चार सामने खेळताना दोन जिंकलेत. तितक्याच सामन्यांत पराभव झाला आहे. मागील लढतीत कोलकातावर मात करताना त्यांनी दोन पराभवाची मालिका खंडित केली. पुन्हा विजयी ट्रॅकवर परतताना कोहली आणि कंपनीने गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
बंगळूरुने तीन विजय मिळवले तरी त्यांची फलंदाजी अपेक्षित होत नाही. पाच सामन्यांनंतर केवळ फाफ डु प्लेसिस तसेच अनुज रावतला अर्धशतक ठोकता आलेले नाही. कर्णधार कोहलीसह दिनेश कार्तिक, शाहबाझ अहमद, ग्लेन मॅक्सवेल. डेव्हिड विली यांना अद्याप सूर गवसलेला नाही. मात्र, लेगस्पिनर वहिंदु हसरंगाने १० विकेट घेत तीन विजयांत मोलाचा वाटा उचलला आहे. त्याला मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलसह आकाश दीपने बऱ्यापैकी साथ दिली तरी डेव्हिड विली, शाहबाझ अहमद, मोहम्मद सिराज यांनी निराशा केली आहे.
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील रिषभ पंतने दोन तसेच डेव्हिड वॉर्नरने एक अर्धशतक मारताना फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे. बॉलिंगमध्ये फिरकीपटू कुलदीप यादव (१० विकेट) आणि खलील अहमदने (७ विकेट) चांगला प्रभाव पाडला आहे. मात्र, कॅपिटल्सना अन्य प्रमुख फलंदाजांकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. तरच त्यांना विजयात सातत्य राखता येईल.
विराटला प्रतीक्षा पहिल्या हाफ सेंच्युरीची
पाच सामन्यांनंतर कर्णधार विराट कोहलीला १५व्या हंगामातील पहिल्या हाफसेंच्युरीची प्रतीक्षा आहे. मुंबईविरुद्धच्या ४८ धावा त्याच्या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत. सलामीला पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद ४१ धावांची खेळी करताना बंगळूरुच्या कॅप्टनने आश्वासक सुरुवात केली. मात्र, कोलकाताविरुद्ध १५ आणि राजस्थानविरुद्ध ५ धावा करता आल्या. मुंबईविरुद्ध बॅट तळपली तरी दोन धावांनी अर्धशतक हुकले. मात्र, मागील लढतीत चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध विराट जेमतेम खाते उघडू शकला.
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, वेळ : रा. ७.३० वा.