Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय

कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय

कोल्हापूर : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात रंगलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा १८ हजार ८०० मतांनी दणदणीत विजय झाला आहे. जाधव यांना ९२ हजार २२६ मते मिळाली. तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भरभक्कम आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात भाजपच्या सत्यजीत कदम यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परिसरातील मते मोजण्यात आली. या भागात सत्यजीत कदम आघाडी मिळवून जयश्री जाधव यांना मागे टाकतील, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला.

कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्‍यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला.

काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती.

जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार

कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

Comments
Add Comment