कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली.
“मतदारांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागतो आणि मतदारांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीत आमचा मुद्दा हा विकासाचाच होता. तुम्ही ५० वर्षात काय केले हे मांडा असे आम्ही म्हणत होतो. आम्हाला राज्यात पाच वर्षे आणि केंद्रात सात वर्षे मिळाली. आम्ही आतापर्यंत काय केले आणि पुढे काय करणार आहोत ते मुद्दे मांडले,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.