पुणे : राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करत आहेत. केवळ अंगावर भगवी शाल पांघरून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता एकदाच होतो, तो पुन्हा घडत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टोला हाणला.
कुठलाही नेता पुन्हा घडत नसतो. पवार साहेब परत घडणार नाहीत, बाळासाहेब ठाकरे परत घडणार नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट ही भाजपने लिहून दिली होती. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हि तयारी केली जात आहे. ते ज्या पद्धतीने अंगावर शाल घेतात, त्यावरून हे समजते. राज ठाकरे हे चांगले अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करतात, असेही रोहित पवार यांनी म्हटले.