Saturday, December 14, 2024
Homeक्रीडाकोलकात्याला हरवून हैदराबाद विजयाची हॅट् ट्रिक साधेल?

कोलकात्याला हरवून हैदराबाद विजयाची हॅट् ट्रिक साधेल?

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामात शुक्रवारी (१६ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादची गाठ कोलकाता नाईट रायडर्सशी पडेल. या लढतीद्वारे केन विल्यमसन आणि सहकाऱ्यांना सलग तिसऱ्या विजयाची संधी आहे.

कोलकाताने ५ सामन्यांत ३ विजयानिशी ६ गुणांसह अव्वल चार संघांत स्थान राखले आहे. हैदराबादने ४ सामन्यांतून ४ गुण मिळवलेत. ताज्या गुणतालिकेत ते आठव्या स्थानी आहेत. विल्यमसनच्या कॅप्टनशिपखाली हैदराबादने गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्सना हरवत फॉर्म मिळवला तरी त्यांना सलग दोन पराभव पाहावे लागले होते. राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सकडून मात खावी खाल्ली. परंतु, सलग पराभवांतून बोध घेत त्यांनी दमदार पुनरागमन केले.

कोलकाताची कामगिरीही संमिश्र राहिली आहे. त्यांनी तीन विजय मिळवलेत. तसेच दोन पराभवही पाहिलेत. सलामीला चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवण्यात यश आले तरी दुसऱ्या सामन्यातबंगळूरुकडून पराभव झाला. त्यानंतर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत सुरेख कमबॅक केले तरी मागील लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला.

हैदराबादकडून बॉलर्सनी बऱ्यापैकी सातत्य राखले आहे. मध्यमगती गोलंदाज टी. नटराजनने ४ सामन्यांत सर्वाधिक ८ विकेट घेतल्यात. त्याला मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ४ विकेट घेत चांगली साथ दिली. तरीही अन्य बॉलर्सना अपेक्षित गोलंदाजी करता आलेली नाही. सनरायझर्सची फलंदाजी ढेपाळली आहे. त्यांच्याकडून केवळ कर्णधार केन विल्यमसन, आयडन मर्करम आणि अभिषेक शर्माला अर्धशतकी मजल मारता आली आहे. राहुल त्रिपाठी, निकोलस पुरनला अपेक्षित फॉर्म गवसलेला नाही.

कर्णधार श्रेयस अय्यरसह वेंकटेश अय्यर तसेच अष्टपैलू पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांच्यासह उमेश यादवने कोलकाताकडून छाप पाडली आहे. मात्र, अजिंक्य रहाणेसह टिम साउदी, सुनील नरिन यांच्या फॉर्मची प्रतीक्षा आहे.

वेळ : रा. ७.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -