द. आफ्रिकेत अतिवृष्टीमुळे हाहाःकार

  52

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सुमारे ३०६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.


संततधार पावसामुळे पाणी ओसरण्यात अडचणी येत आहेत. अनेक घरे कोसळली असून इमारतींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की, डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे ५२ दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


सुमारे १२० शाळा पुराच्या पाण्याने वेढल्या आहेत. या परिस्थितीमुळे प्रशासनाने शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. शिक्षण मंत्री अँजी मोशेगा यांनी सांगितले की, पुरामुळे विविध शाळांमधील सुमारे १८ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही एक दु:खद बाब आहे आणि यामुळे भयंकर नुकसान झाले आहे. हा चिंतेचा विषय आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून बाधित भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कुटुंबे बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर

३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही म्हणून हिंदू महिलेवर बलात्कार आणि मारहाण, आरोपीला अटक

ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक