कोल्हापूर : राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसाबाबत वाद सुरु असताना कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसावरून रामायण सुरु झाले आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू श्रीरामांचे नाव चित्रित केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार झाला आहे तो अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केली आहे. बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील असून या कृत्याविरुद्ध कागल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून आता कागलमधील राजकारणात वेगळ्या वादाला तोंड फुटले आहे.
ही घटना अशी की, रामनवमी दिवशी मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांचे नाव आहे. या जाहिरातीला राम नवमीची डिझाइन करण्यात आली असल्याने भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारे राम या शब्दाची डिझाईन कशी काय करू शकता, तुम्ही रामापेक्षा मोठे आहात का, असा सवालही त्यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू श्रीरामांचे नाव चित्रित केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार झालाय तो अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे समरजीतसिंह घाटगे यांनी केली आहे. बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील असून प्रभु श्रीराम यांचा एकेरी उल्लेख केला असल्याने घाटगे यांनी कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्याची मागणी केली आहे.