मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना, शिवाजी पार्क, दादर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ दरम्यान १३व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तब्बल २ वर्षांनंतर महाराष्ट्र कॅरम संघटनेकडून राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याने स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना संघटनेच्या वतीने मोफत गणवेश देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे १४ एप्रिल २०२२ पर्यंत नोंदवावीत.