कणकवलीत लोडशेडिंग केले, तर कार्यालयाला टाळे ठोकू

सिंधुदुर्ग (हिं.स.) : कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात आक्रमक होत भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी वीजवितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. कार्यकारी अभियंता मोहिते यांना लोडशेडिंगबाबत जाब विचारत परीक्षा सुरू असताना लोडशेडिंग केल्यास कार्यालयाच्या गेटवरच ठिय्या देऊ, प्रसंगी कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे व भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.


दळभद्री महाविकास आघाडी सरकार आल्यापासून लोड शेडिंग सुरू झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होते. जिल्ह्यात आणि तालुक्यात सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत. परीक्षा कालावधीत लोडशेडिंग करून शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. अन्यथा, आम्ही गप्प बसणार नाही असेही भाजप पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.


कमी वीजदाबामुळे चिरेखाण व्यावसायिकांच्या मोटर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत रिले बदलला नाही, तर जळालेल्या सर्व मोटर आणून तुमच्या केबिनमध्ये टाकू, असे उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी ठणकावले. ब्रेकर खराब असल्यामुळे लो व्होल्टेजची अडचण असल्याचे कार्यकारी अभियंता मोहिते म्हणाले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांची सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा