मुंबई : भारतीय रेल्वेने आता तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल केले आहेत. रेल्वेच्या या नविन निर्णयानुसार आता तिकीट बुकिंगच्या वेळी पत्ता द्यावा लागणार नाही. यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा कमी वेळेत तिकीट बुक करू शकाल. कोरोनाचे घटणारे प्रमाण पाहता काही बंद असलेल्या सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे, आयआऱसीटीसी वेबसाइट आणि अॅपवर तिकीट बुक करणाऱ्यांना गंतव्य स्थानाचा पत्ता प्रविष्ट करणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु कोविड-१९ संसर्गात घट झाल्याने आयआऱसीटीसीला गंतव्यस्थानाचा पत्ता देणे गरजेचे नाही. रेल्वे मंत्रालयाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
त्यामुळे तिकीट बुकिंग दरम्यान लागणारा वेळही कमी होणार आहे. हे आदेश रेल्वेच्या सर्व विभागांना देण्यात आले आहेत. आयआऱसीटीसीलाही आदेशानुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील.