मुंबई (वृत्तसंस्था) : “जेव्हा ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकतो तेव्हा ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला अशा बातम्या दिल्या जातात. मात्र भारताने विश्वचषक जिंकल्यावर मात्र धोनीने विश्वचषक जिंकला, असे म्हटलं जातं. मग बाकीचे दहा खेळाडू काय लस्सी पिण्यासाठी गेले होते का? असा संतप्त सवाल भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने केला आहे.
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. संघातील सात ते आठ खेळाडू जेव्हा चांगल्या पद्धतीने खेळतात तेव्हाच संघ पुढे जाऊ शकतो, असेदेखील हरभजन सिंग म्हणाला. सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर मत मांडण्यासाठी एका कार्यक्रमात हरभजनसिंग बोलत होता. यावेळी त्याने हे वक्तव्य केले.
सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. कोणता संघ कधी सामना फिरवेल, हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातही नव्या आलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनीदेखील चांगली खेळी करून दाखवलेली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत कोण धडक मारणार, याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. असे असताना भारताचा माजी क्रिकेटर हरभजनसिंगने हा संतप्त सवाल केलाय. त्याने सगळे धोनीने वर्ल्डकप जिंकला, असे म्हणतात. मग बाकीचे दहा खेळाडू काय लस्सी पित होते का? असा सवाल केला आहे.