मुंबई (प्रतिनिधी) : फॉर्मात असलेच्या अमित शर्माचे (९९ चेंडूंत १०६ धावा) दणकेबाज शतक आणि देवेन शाहच्या (२० धावांत ६ विकेट) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर शिवाजी पार्क यंगस्टर्स (एसपीवाय) सीसीने मॅनग्रोल स्पोर्ट्स क्लब आणि पल्स स्पोर्ट्स इव्हेंट एंटरटेनमेंट आयोजित एमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ग्रुप एचमध्ये माझगाव स्पोर्ट्स क्लबवर २१३ धावांनी मोठा विजय मिळवला.
क्रॉस मैदान येथील एम. बी. युनियन मैदानावर झालेल्या सामन्यात एसपीवाय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत ४ बाद २७२ अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यात अमितच्या १०६ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याच्या शतकी खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. अमितला दीपक वर्मा (नाबाद ६४) आणि तनिष्क पानिकेविटीलची (५१ धावा) चांगली साथ लाभली. माझगाव एससीच्या फलंदाजांनी निराशा केली. देवेन शाह (६ विकेट) आणि विशाल प्रसादच्या (३ विकेट) प्रभावी बॉलिंगसमोर त्यामुळे त्यांचा डाव १५.२ षटकांत अवघ्या ५९ धावांमध्ये आटोपला.
अन्य लढतीत बॉम्बे जिमखाना संघाने क्रिसेंट क्रिकेट क्लबचा ५ विकेटनी तसेच अपोलो सीसीने यंग मोहमेडन सीसीवर ३ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
क्रिसेट सीसी – ४० षटकांत ६ बाद २१० पराभूत वि. बॉम्बे जिमखाना – ५ बाद २१३ धावा.
निकाल : बॉम्बे जिमखाना ५ विकेट राखून विजयी.
अपोलो सीसी – ४० षटकांत सर्वबाद २४६ विजयी वि. यंग मोहमेडन सीसी – ४० षटकांत ९ बाद २४३.
निकाल : अपोलो सीसी ३ धावांनी विजयी.
पय्याडे स्पोर्ट्स क्लब – ४० षटकांत ९ बाद १८९ पराभूत वि. फोर्ट विजय सीसी – ३८.५ षटकांत ६ बाद १९०.
निकाल : फोर्ट विजय सीसी ४ विकेट राखून विजयी.
जॉन ब्राइट क्रिकेट क्लब – ३९ षटकांत ९ बाद २३१ विजयी वि. रिगल एससी – ३५.३ षटकांत सर्वबाद २१०.
निकाल : जॉन ब्राइट क्रिकेट क्लब २१ धावांनी विजयी.
व्हिक्टरी सीसी – ४० षटकांत सर्वबाद १३२ पराभूत वि. शिवाजी पार्क जिमखाना – ३५ षटकांत ३ बाद १३५.
निकाल : शिवाजी पार्क जिमखाना ७ विकेट राखून विजयी.
शांतीलाल मेमोरियल सीसी – २४.५ षटकांत सर्वबाद ८९ पराभूत वि. सिंद एससी – ३२.३ षटकांत ६ बाद ९१.
निकाल : सिंद एसीसी ४ विकेट राखून विजयी.
डॉ. डी. वाय. पाटील एसए – ३६.५ षटकांत सर्वबाद १४६ पराभूत वि. पार्कोफेने क्रिकेटर्स – ३४.५ षटकांत ७ बाद १४९.
निकाल : पार्कोफेने क्रिकेटर्स ३ विकेट राखून विजयी.
शिवाजी पार्क यंगस्टर्स सीसी – ४० षटकांत ४ बाद २७२ विजयी वि. माझगाव एससी – १५.२ षटकांत सर्वबाद ५९.
निकाल : शिवाजी पार्क यंगस्टर्स २१३ धावांनी विजयी.