Sunday, July 21, 2024
Homeकोकणरायगडबळवलीच्या अजय पाटीलचा विश्वविक्रम

बळवलीच्या अजय पाटीलचा विश्वविक्रम

तासाभरात केले १७०० जोर सूर्यनमस्कार

देवा पेरवी

पेण : रायगड जिल्ह्यातील अयोध्या म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातील बळवली गावचा सुपुत्र अजय कमलाकर पाटील याने विश्वविक्रम केला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एका तासात १७०० जोर सूर्यनमस्कार काढून IEA Book of World Record जागतिक विश्वविक्रम करत बळवली गावाचे नाव देश पातळीवर मोठे केले.

अजय पाटील याने याअगोदर हनुमान व्यायामशाळा पेण येथे ५ तासांत ५५५५ जोर सूर्यनमस्कार काढून रेकॉर्ड बनवला होता. यासाठी तो गेली १२ वर्षे मेहनत करत आहे. यावेळी अजय पाटील IEA Book of World Record साठी एक तासात १५०० जोर सूर्यनमस्कारांचे लक्ष्य देण्यात आले होते, मात्र अजय पाटीलने एक तासात १७०० जोर सूर्यनमस्कार पूर्ण करून हा विश्वविक्रम केला. या वेळी पद्मश्री शिवानंद स्वामी यांच्या हस्ते अजय पाटीलचा सन्मान करण्यात आला. सदर रेकॉर्डवेळी देश-विदेशातून मान्यवर व कलाकार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अलिबागचे आ. महेंद्र दळवी, पेणचे आ. रवींद्र पाटील, नरेंद्र ठाकूरआदींनी विक्रमवीर अजय पाटीलचा गौरव केला आहे.

संपूर्ण गावातून मिरवणूक

एका तासात १७०० जोर सूर्यनमस्कार काढून विश्वविक्रम केल्याने सर्व स्तरांतून अजय पाटीलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बळवली ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत अजयची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -