
सिंधुदुर्ग (हिं. स.) : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना हजर होण्याबाबत न्यायालयाने सूचना दिल्यानंतर आता टप्प्याटप्याने कर्मचारी कामावर हजर होत आहेत. कणकवली विभागात गेल्या तीन दिवसांत ६४ कर्मचारी हजर झाले आहेत, तर आतापर्यंत सुमारे ३०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या तीन दिवसांत १५ चालक, १२ वाहक, १६ चालक कमी वाहक, १८ यांत्रिकी कर्मचारी, तीन प्रशासकीय कर्मचारी असे ६४ कर्मचारी हजर झाले आहेत. पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी हजर होतील, अशी शक्यता व्यक्त केली हात आहे.
कर्मचारी हजार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूकही अधिक प्रमाणात सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात २२० पर्यंत सुटणाऱ्या फेऱ्या आता ३०० पर्यंत गेल्या असून पुढील आठ दिवसांत ५० टक्के वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.