Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबई विमानतळावर २४ कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई विमानतळावर २४ कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाने एका परदेशी व्यक्तीला मंगळवारी सायंकाळी मुंबई येथील छञपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. या व्यक्तीकडून ३.९८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हेरॉइनची किंमत २४ कोटी रुपये इतकी आहे.

एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई विमानतळावरुन या दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती जोहान्सबर्ग येथुन मुंबईत आली आहे. या व्यक्तीकडील ट्रॉलीमधील बॅगमध्ये अंमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता बॅगेमध्ये चार पिशव्या आढळून आल्या.

या पिशव्या बॅगमध्ये एका गुप्त कप्प्यामध्ये लपवण्यात आल्या होत्या, असे एनसीबीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बॅगेचा पुढील भाग तोडल्यानंतर त्यात या पिशव्या सापडल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -