Friday, May 9, 2025

महामुंबईठाणेमहत्वाची बातमी

२ हजार ५१ वह्यांनी साकारले सिम्बॉल ऑफ नॉलेज

२ हजार ५१ वह्यांनी साकारले सिम्बॉल ऑफ नॉलेज

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि बासरीवाला आधुनिक ढोल-ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने २ हजार ५१ वह्यांचा वापर करून सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या प्रतिकृतीच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली आहे.


कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयाच्या शेजारी जयंती महोत्सव गेल्या तीन दिवसांपासून साजरा केला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. रूपेश गायकवाड आणि रोहन जगताप यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे.


समितीचे अध्यक्ष केतन रोकडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या मंडळींनी शिवजयंतीच्या दिवशी पाच हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून महाराजांची प्रतिमा साकारली होती. त्या पाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती उभारली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Comments
Add Comment