नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.
नवनीत यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. यानंतरच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
राणा यांच्या सुरक्षेसाठी आता ११ कमांडो तैनात असणार आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्यांचा समावेश आहे. हे सुरक्षा पथक २४ तास खासदार नवनीत रवी राणा यांच्या समवेत राहणार आहेत.