Saturday, July 6, 2024
Homeकोकणरायगडगटारांवरील अनधिकृत बांधकामांवर पाली नगरपंचायत कारवाई करणार का?

गटारांवरील अनधिकृत बांधकामांवर पाली नगरपंचायत कारवाई करणार का?

स्थानिकांचा प्रश्न

सुधागड-पाली (प्रतिनिधी) : पाली नगरपंचायत क्षेत्रात जागोजागी तुंबलेली गटारे व नाले हे नेहमीचे चित्र आहे. हे चित्र बदलण्याचे पाली नगरपंचायतीने मनावर घेतले आहे. त्याच अनुषंगाने पाली शहरात नगरपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून पाली नगरपंचायत हद्दीतील गटारे स्वच्छ करण्याचे व गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. पाली नगरपंचायतीचे नगरसेवक आपापल्या वार्ड मध्ये जातीने लक्ष देत गटारे स्वच्छ करण्याचे काम करून घेत आहे.

ही साफसफाई करताना, सफाई कामगारांना बऱ्याच अडचणी येत आहेत. कित्येक ठिकाणी गटारांवर दुकानदारांनी कायमस्वरूपी स्लॅब टाकले आहेत. तसेच काही ठिकाणे गटारांवर बांधकामे करण्यात आली आहेत. याठिकाणी सफाई कामगारांना गटारे साफ करता येत नाहीत. त्यामुळे बाटल्या, कचरा अडकून पाणी तुंबत आहे व या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे गरजेचे आहे, तसे न केल्यास गटारे साफसफाई हा केवळ एक फार्स आहे, अशी भावना आमच्या मनात निर्माण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाली नगरपंचायत हद्दीतील गटारावरील अनधिकृत बांधकामांवर पाली नगरपंचायत कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -