अनिकेत देशमुख
भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेल्या शिक्षण अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांनी मीरा-भाईंदर शहरात महानगर पालिकेच्या ३६ शाळांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. शाळांमध्ये असणारी कमतरता व शाळेतील शिक्षक-विद्यार्थी यांना होणाऱ्या समस्या व शाळेतील विद्यार्थी यांना अभ्यास उपयोगी सर्व सामग्री मिळवून देण्याचा प्रयत्न भोसले यांनी सुरू केला आहे.
प्रियंका भोसले यांनी मनपा शाळांना भेट दिल्यानंतर सर्व शाळांच्या भिंतीचा रंग खराब झाल्याने त्यांची रंगोटी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भूगोल, बीजगणित, इतिहास, खेळातील काही चित्र, कार्टूनचे चित्र, कवायतीचे चित्र याचबरोबर आपले शहर व परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, याकरता स्वच्छतेशी निगडीत चित्रही सर्व मनपा शाळांच्या भिंतींवर काढण्यात येत आहेत.
पालिकेच्या ३६ शाळांमध्ये इयत्ता ८वीचे वर्ग असणाऱ्या आठ शाळा आहेत व सध्या १ली ते ८वीच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रियंका भोसले यांनी मनपा शाळांना भेट दिल्यानंतर सर्व शाळांच्या भिंतीचा रंग खराब झाल्याने त्यांची रंगोटी करण्याचे आदेश दिले होते.