Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

माऊलींची पालखी २१ जून रोजी ठेवणार प्रस्थान

सोलापूर (हिं.स.) कोरोनाच्या महामारीनंतर यंदाच्या वर्षी आषाढी वारीचा महासोहळा पंढरपूरमध्ये भरणार आहे. लाखो वारकऱ्यांसमवेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. यंदाच्या वर्षी तिथीच्या वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली.


श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पायी वारीचं वेळापत्रक सादर झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वाढ झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्यानं वाहन पास दिले जातील, अशीही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.


२१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. २१ जून आणि २३ जून रोजी पुणे, २४ आणि २५ जून रोजी सासवड, २६ जून रोजी जेजुरी, २७ जूनला वाल्हे, २८ आणि २९ जूनला रोजी लोणंद, ३० जूनला तरडगांव, १ आणि २ जुलै रोजी फलटण, ३ जुलै रोजी बरड, ४ जुलैला नातेपुते, ५ जुलैला माळशिरस, ६ जुलैला वेळापूर, ७ जुलैला भंडीशेगाव, ८ जुलै रोजी वाखरी तर ९ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवारी, १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.

Comments
Add Comment