Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रवीज पडल्याने फटाक्यांचा ट्रक जळून खाक

वीज पडल्याने फटाक्यांचा ट्रक जळून खाक

सोलापूर : सोलापूर पुणे हायवेवर वरवडे टोल नाका भागात आज पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसात, फटाक्यांनी भरलेल्या चालत्या ट्रकवर वीज पडून भीषण आग लागल्याने फटाक्यांसह ट्रकचे नुकसान झाले आहे.

पहाटे तीनच्या सुमारास फटाक्यांचा ट्रक पुणे मार्गाहून सोलापूरकडे जात असताना चालत्या ट्रकवर वीज पडली. यामुळे ट्रक मधील फटाके पेटले आणि एका मागोमाग एक फटाक्यांचे स्फोट होऊ लागल्याने ट्रक पेटला.

या दुर्घटनेत, ट्रक चालकाने सावधानता बाळगत ट्रक सोडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक संपूर्णपणे फटाक्यांनी भरलेला असल्यामुळे जवळपास दोन तास सोलापूर पुणे हायवेवर फटाक्यांची आतिषबाजी सुरुच होती.

या अग्नितांडवामुळे दोन्ही बाजूची वाहतूक साधारण दोन तास थांबली होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा, पोलीस पथके, आरोग्य पथके वेळेत दाखल झाली. संपूर्ण आग विझवल्यानंतर हायवेवरची वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीतपणे सुरु करण्यात आली. मात्र, हायवेवर घडलेल्या या फटाक्यांच्या स्फोटाने अवघा परिसर दणाणून निघाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -