सावंतवाडी (प्रतिनिधी) : आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियममध्ये झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत मळगांवच्या प्रथमेश कातळकरने सुवर्णपदक पटकावले. इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशन आयोजित व फिटलाइन प्रायोजित पाचव्या मास्टर मेन्स फिजिक चॅम्पियन स्पर्धेतील ६० किलो वजनी गटात त्याने हा किताब पटकावला.
त्याला त्याचे प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी राजन जाधव यांचे सहकार्य लाभले. प्रथमेश हा सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचा सुपुत्र असून त्याने यापूर्वी सिंधुदुर्ग ‘श्री’, वेंगुली ‘श्री’, कट्टा ‘श्री’ असे अनेक मानाचे किताब त्याने प्राप्त केले आहेत.