
मुंबई : काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमादरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांनी स्टेजवर तलवार हाती घेतल्याप्रकरणी बांद्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ठाण्यात उत्तर सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्याची चौकशी होणार असून, आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे. असे असतानाच भरसभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर ठाण्यातील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
काल राज ठाकरे यांची उत्तर सभा पार पडली. सभेत कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट दिली होती. यावेळी राज ठाकरे यांनी भरसभेत ही तलवार काढून दाखवली. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र उगारणे कायद्याने गुन्हा नोंद होवू शकतो. भाजप नेते मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केल्यानंतर महाविकासआघाडीतील नेते आणि मंत्र्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यापाठोपाठ आता ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.