विक्रमगड (वार्ताहर) : प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा अंतर्गत डोल्हारी बुद्रुक मूसलपाडा येथे आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली असून या ठिकाणी फक्त वीजव्यवस्था व पाणीव्यवस्था बाकी असून सदर इमारत आता पूर्ण झाली आहे. हे उपकेंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
आरोग्य यंत्रणेला बळकटी करून प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळण्याच्या उद्देशाने शासनाने ग्रामीण भागात उपकेंद्र यांना मंजुरी दिली. प्रत्यक्ष हे काम आता पूर्ण झाले असून हे उपकेंद्र आरोग्य विभागाच्याही ताब्यात देण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी आरोग्याची सुविधा सुरू करावी, या प्रतीक्षेत आता या भागातील नागरिक आहेत.
प्रत्यक्ष तालुक्यातील उपकेंद्राच्या बांधकामाना मंजूरी मिळाली; परंतु या आरोग्य उपकेंद्रे लागणारे कर्मचाऱ्यांची मात्र पदे मंजूर झालेली नाहीत. तालुका शेवता, मोह ही उपकेंद्र गेली पाच वर्षे झाली आहेत. चालू होऊनही पदे मंजूर नसून ही पदे लवकरात लवकर मंजूर करावीत, अशी मागणी लोकांनी केली आहे.
आरोग्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत असताना मात्र कर्मचारीच नसतील, तर हे उपकेंद्रे चालणार कशी?, असा सवाल नागरिकांनी केला आहे. याबाबत आरोग्य विभागाशी विचार केली असता सध्या तात्पुरता पदभार देऊन हे उपकेंद्र सुरू आहे. पदे लवकरात लवकर भरले जातील, असे त्यांनी सांगितले. तरी तालुक्यातील उपकेंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावे, अशी मागणी कॉ. किरण गहला यांनी केली आहे.