Friday, May 16, 2025

ठाणे

जागे व्हा आयुक्त... निषेधात्मक गाण्याद्वारे आंदोलन

जागे व्हा आयुक्त... निषेधात्मक गाण्याद्वारे आंदोलन

कल्याण (प्रतिनिधी) : सलग पाचशे दिवस आंदोलन करून देखील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने आज डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निबाळकर यांनी “जागे व्हा आयुक्त’’ हे निषेधात्मक गाणं गात आंदोलन केले. कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर मुनींचा वेष परिधान करत निंबाळकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


महेश निंबाळकर हे गेल्या ५०० दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने आज त्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुनींच्या वेषात आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी निषेधात्मक गाणं गात लोकांचे लक्ष वेधले. डोंबिवलीतील जैन प्रार्थनास्थळासह इतरही अनधिकृत बांधकामांबाबत आपण पालिका प्रशासनाकडे ५ वर्षांपासून पाठपुरावा करत असून पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.


केवळ नागरिकांना दाखवण्यासाठी पालिका कारवाई करत आहे. यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या आयुक्तांना जागं करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली.

Comments
Add Comment