मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागातील ६ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या विभागीय परिषदेचे १२ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ही राज्ये/ केंद्रशासित प्रदेश या परिषदेत सहभागी होतील.
देशाच्या लोकसंख्येत महिला आणि बालकांचे प्रमाण सुमारे ६७.७% आहे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि संरक्षण आणि सुरक्षित आणि निर्भय वातावरणात त्यांचा समग्र विकास सुनिश्चित करणे, परिवर्तनात्मक आर्थिक आणि सामाजिक बदल साध्य करण्याच्या उद्देशाने देशाच्या शाश्वत आणि समन्यायी विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या मोहिमेच्या स्वरूपात राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या तीन छत्रधारक योजनांना मंजुरी देण्यात आली.
या तीन योजनांची अंमलबजावणी १५व्या वित्त आयोगाच्या काळात २०२१-२२ ते २०२५-२६ मध्ये केली जाणार आहे. या छत्रधारक योजनांच्या अंतर्गत असलेल्या योजना या केंद्र पुरस्कृत आहेत आणि त्यांची अंमलबजावणी राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनांकडून खर्च विभागणी निकषांनुसार केली जाते.
महिला आणि बालकांसाठी राज्यांनी केलेल्या कामातील तफावत भरून काढणे आणि लिंग समानतेवर आधारित आणि बालक केंद्रित कायदे, धोरणे आणि कार्यक्रम तयार करणे आणि महिला आणि बालकांना अतिशय सहजसाध्य, परवडण्याजोगे, विश्वासार्ह आणि सर्व प्रकारचे भेदभाव आणि हिंसाचारविरहित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आंतर मंत्रालयीन आणि आंतरक्षेत्रीय एकजुटीला चालना देणे हे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या दिशेने या मंत्रालयाच्या योजनांतर्गत असलेली उद्दिष्टे प्रत्यक्ष जमिनीवर या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तरदायी आहेत ती राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन यांच्या पाठबळाने साध्य करण्याची अपेक्षा आहे. मंत्रालयाच्या या तीन महत्त्वाच्या योजनांविषयी राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या विभागीय परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.