Friday, May 9, 2025

महामुंबई

संजीवन समाधीच्या ७२५व्या वर्षानिमित्त अजानवृक्षाचे रोपण

संजीवन समाधीच्या ७२५व्या वर्षानिमित्त अजानवृक्षाचे रोपण

मुंबई (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७२५व्या वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे अध्यात्मिक व धार्मिक महत्त्व असलेल्या अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले,  त्यावेळी ते बोलत होते.


 सिद्धवृक्ष गोरक्षवल्ली,  शांभवी,  योगवल्ली आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अजानवृक्षाचे राजभवन येथे रोपण केल्यामुळे त्याला राजाश्रय मिळाला असे बायोस्फिअर्स  संस्थेचे संस्थापक व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, हभप माणिक महाराज मोरे, डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. मोहन वामन, डॉ. शंकर लावरे, सुरेश वैद्य, शिवलिंग ढवलेश्वर, दिपक हरणे, दत्तात्रय गायकवाड,  चंद्रकांत सहासने,  आशीष तिवारी,  जय जगताप, सुनील जंगम,  निवेदिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. लावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जायभाये यांनी आभार मानले.

Comments
Add Comment