मुंबई : विक्रात निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या नंतर आता त्यांचा मुलगा नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे.
आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.