Friday, May 9, 2025

महामुंबई

राणी बागेतील वाघांना फ्रुट आईस

मुंबई (प्रतिनिधी) : एप्रिल महिन्यातच मुंबईत उन्हाचे चटके लागायला लागले आहेत. मात्र या उष्णतेमुळे माणसचं नाही तर प्राणीही हैराण झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. यासाठी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत असून राणीच्या बागेत पशूपक्ष्यांना फळांच्या मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे.


भायखळ्यातील माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उद्यानातील अस्वलांसाठी फ्रुट आईस केकची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती झू बायोलॉजिस्ट अभिषेक साटम यांनी दिली. तर अशीच व्यवस्था वाघ आणि बिबट्यांची केली गेली आहे. पिंजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांसाठी मांसाहारी फ्रुट आईस केकची मेजवानी देण्यात येत आहे असेही अभिषेक साटम यांनी सांगितले.


प्राण्यांच्या शरिरात थंडगार पदार्थ जावेत यासाठी हत्तींच्या आहारात कलिंगड आणि शहाळी देण्यात येत असून माकडांसाठी खास फळांच्या लॉलीपॉपचा बेत करण्यात आला आहे, अशी माहिती साटम यांनी दिली.

Comments
Add Comment