नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आयपीलची सुरुवात गतविजेत्या चेन्नईसाठी निराशाजक झाली आहे. दरम्यान, चेन्नईची अशी दुर्दशा झालेली असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आणि चेन्नईच्या कर्णधारपदावर मोठं भाष्य केले आहे. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा नव्हे, तर फाफ डू प्लेसिस असायला हवा होता. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला जाऊ द्यायला नको होते, असे शास्त्री म्हणाले.
“रवींद्र जडेजासारख्या खेळाडूने खेळावर लक्ष केंद्रित करावे असे मला वाटते. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला जाऊ द्यायला नको होते. फाफ हा सामन्याला कलाटणी देणार फलंदाज आहे. धोनीला कर्णधारपद नको होते, तर त्याऐवजी फाफ डू प्लेसिसकडे ही जबाबदारी सोपवायला हवी होती.
जडेजाने एक खेळाडू म्हणून सामन्यात सहभागी व्हायला हवं होतं. कर्णधारपद नसल्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकला असता. कर्णधार नसल्यामुळे जाडेजावर दबाव नसता,” असे वृत्तसंस्थेशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले.