Sunday, June 15, 2025

सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ

सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तो कालावधी आज संपल्याने सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी योरदार युक्तीवाद करत तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत सदावर्तेंच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. पोलिस कोठडीच्या दोन दिवसांत त्यांची चौकशी केली गेली आहे. पण दोन दिवसांचा कालावधी हा चौकशीसाठी पुरेसा नाही. 'कुछ बातें हो चुकी है, कुछ बातें अभी है बाकी', अशी परिस्थिती असल्याने सदावर्तेंना आणखी ११ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सदावर्तेंना आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कर्मचाऱ्यांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, ही कारवाई रोषातून सुरू असल्याचे सदावर्तेंच्या वकिलांनी किल्ला कोर्टाता बाजू मांडताना म्हटले होते.

Comments
Add Comment