Wednesday, July 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख“उद्योगविश्वातील महाविलीनीकरणाने आली तेजी”

“उद्योगविश्वातील महाविलीनीकरणाने आली तेजी”

मागील आठवड्याचा सोमवार उजाडला तोच एक मोठी बातमी घेऊन आणि त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजारांची सुरुवात होताच काही सेकंदातच शेअर बाजाराने मोठी उडी घेत त्या दिवशीचा उच्चांक काही क्षणात नोंदविला. याला कारणं आणि बातमी तशीच होती. निर्देशांकामध्ये वजनदार समजले जाणारे एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांनी भारताच्या उद्योगविश्वातील सर्वात मोठ्या विलीनीकरणाची घोषणा केली आणि परिणामी निर्देशांकांनी मोठी झेप घेतली. याच्या परिणामी एचडीएफसी या सर्व ग्रुप कंपनीमध्ये मोठी वाढ दिसून आली. या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही १०० टक्के सार्वजनिक भागधारकांची कंपनी बनेल, तर एचडीएफसी लिमिटेडमधील भागधारकांची एचडीएफसी बँकेत ४१ टक्के मालकी राहील. एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील एचडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येक २५ शेअर्स मागे ४२ शेअर्स मिळवता येतील. त्यांची ही विलीनीकरण प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

“एचडीएफसी एमसी”चे मार्केट कॅपिटल आज जवळपास ४७ हजार करोडचे असून फेस व्हल्यू ५ आहे. ही भारतातील मोठी “असेट मॅनेजमेंट” कंपनी असून यांचे मोठ्या प्रमाणात सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत. यांच्या जवळपास २३ इक्विटी संलग्न स्कीम्स आहेत. सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा तेजीची असून टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार रेणुका शुगर, डॉलर इंडस्ट्रीज, कमिन्स इंडिया, मद्रास फर्टिलायझर, जेकेपेपर यांसारख्या अनेक शेअर्सची दिशा तेजीची झालेली आहे. आपण आपल्या मागील आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या तेजीनंतर “सेक्वेंट सायंटिफिक” या शेअरने १४४ ही पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज १४४.५५ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या शेअरमध्ये योग्य स्टॉपलॉसचा वापर करून गुंतवणूक केल्यास मध्यम मुदतीत चांगला फायदा होऊ शकतो, असे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर केवळ एका आठवड्यात या शेअरने १५६ रुपये हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास या शेअरमध्ये आपण सांगितल्यानंतर ७.९० टक्क्यांची वाढ झालेली आहे.

मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५८५०० आणि निफ्टीची १७५०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकामधील वाढ कायम राहील. मागील आठवड्याच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक शुगर कंपन्यांचे शेअर्स हे तेजीचे संकेत देत आहेत. ज्यामध्ये बलरामपूर चिनी, राणा शुगर, उगार शेअर, धामपूर शुगर हे शेअर्स तेजीमध्ये आहेत. त्यामुळे अल्पमुदतीसाठी शुगर सेक्टरकडे पाहता येईल. आपण मागील लेखातच कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७१०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची

दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५१५०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. याच आठवड्यात नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्विमासिक पतधोरण जाहीर झाले. यामध्ये रिझर्व्ह बँकेने सार्वत्रिक अपेक्षेप्रमाणे यामध्ये कोणताही बदल केला नाही. यामध्ये सांगताना एटीएममधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एटीएम कार्डाच्या वापराविना पैसे काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता युपिआय प्रणालीचा वापर करून सर्व बँका कार्डाविना पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देतील. विकासदर अंदाज घटून तो ७.२ राहिला असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आर्थिक वर्षातील महागाई दरासंबंधीचे अनुमान वाढवून ते ४.५ टक्क्यांवरून ५.७ टक्के केलेले आहे. मध्यवर्ती बँकेने कच्चे तेल १०० डॉलर प्रती बॅरेल राहील, असे गृहीत धरून विकासदर आणि चलनवाढीचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

डॉ. सर्वेश सुहास सोमण samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -