Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीकारला धडकून बस पलटली; एकाचा जागीच मृत्यू

कारला धडकून बस पलटली; एकाचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. पुण्यातील या अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. हा अपघात १० तारखेच्या रात्री ११:२५ च्या सुमारास मौजे बजरंगवाडी, शिरूर येथे झाला.

पुणे अहमदनगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर एका स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिवायडरच्या कठड्यास धडकून ती कार पुण्याहून पुढे अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या लक्झरी बसला धडकली. या अपघातात त्या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारने दिलेल्या धक्क्यामुळे बस पलटी होऊन अहमदनगर बाजूकडील रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलच्या मुख्य दरवाज्यात घुसली.

या अपघातात लक्झरी बस मधील चालकासह २२ ते २५ जण जखमी झाले आहेत. यातील ५ जण गंभीर असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -