झारखंडमध्ये रोपवेचा भीषण अपघात, ४८ पर्यटक अडकले

झारखंड : झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये अनेक पर्यटक ट्रॉलीत अडकले आहेत. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. तर  ८ जण जखमी झाले आहेत. देवघरमध्ये त्रिकुटी डोंगरावर रोपवेची एक ट्रॉली वरुन खाली येत असताना, खालून वर जाणा-या एका ट्रॉलीला धडकून हा भीषण अपघात झाला. दरम्यान आज दुपारपर्यंत १८ पर्यटकांना बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले आहे.


काल दुपारची ही घटना असून अजूनही ४८ जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. सध्या एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीनं आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.


देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. त्यांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी एनडीआरएफचं पथक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना संयम राखण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे.

Comments
Add Comment

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून