Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीविद्यार्थ्यांना मिळणार आता शेअर बाजाराचे धडे

विद्यार्थ्यांना मिळणार आता शेअर बाजाराचे धडे

मुंबई : मुंबई महापालिका शाळांमधील सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आता शेअर बाजाराचे धडे दिले जाणार आहेत. जून महिन्यापासून हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिका शिक्षण विभाग यांच्यात अर्थविषयक सर्वसमावेशक सामंजस्य करार मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, काही दिवसांत मुंबई महापालिका शाळेत अॅस्ट्रोनॉमी लॅब आणणार आहोत. आर्थिक साक्षरतेचा पाठ सुरु करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. बीएसई हे एक पर्यटनाचे चांगले स्थळ आहे. न्यूयॉर्कच्या धर्तीवर हॉर्निमन सर्कलला जिथे सुरुवातीला स्टॉक एक्चेंज सुरु झाले तिथेही पर्यटकांना जाता येईल, राजकीय लोकांना आयटीची नोटीस आल्यावर कळायला लागते फायनान्शिअल मॅनेजमेंट म्हणजे काय, असेही ते म्हणाले.

पुढची पिढी घडवायची असेल तर आर्थिक साक्षरता आणणे गरजेचे आहे. ८ वी, ९ वीच्या विद्यार्थ्यांकरता विशेष अभ्यासक्रम आणि ६ वी, ७ वीच्या विद्यार्थ्यांना स्टॉक एक्सचेंजचे गेम, बीएसईची ओळख करुन दिली जाणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -