इम्रान खान यांची विकेट, आता शरीफ मैदानात!

  68

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पहिला अंक शनिवारी मध्यरात्री उशिरा पाक संसदेमधील नाट्यमय घडामोडींनंतर संपला. रात्री उशिरा पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. पाक संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे अखेर इम्रान खान यांची विकेट पडली असून पंतप्रधानपदावरून ते पायउतार झाले आहेत. अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दरम्यान इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटविल्यानंतर विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.


पाकिस्तानात आजवर कोणत्याही सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. आता इम्रान खान यांनाही मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकच्या संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष ‘पीटीआय’च्या सदस्यांनीही सभागृहातून काढता पाय घेतला. पुढचे कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवले. अविश्वास ठरावावर मध्यरात्रीनंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा ठराव अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी जिंकला. इम्रान यांच्यावर १७४ सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला व ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सादिक यांनी बहुमताने हा ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले.


याआधी गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र पाकच्या संसदेचे अध्यक्ष कासिम सुरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. मात्र, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कासिम सुरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अविश्वास ठरावाची वाट मोकळी करून दिली.

Comments
Add Comment

PM Narendra Modi Ghana Visit : अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान, 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' प्रदान

घाना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे, या दरम्यान ते ब्राझीलमध्ये होणाऱ्या

न्यू जर्सीमधील विमानतळावर टेकऑफ दरम्यान मोठा अपघात; स्कायडायव्हिंग विमान कोसळले

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विमान अपघात झाला आहे. दक्षिण न्यू जर्सी येथील विमानतळावर एक छोटे

इंडोनेशियात ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली

बाली : पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या इंडोनेशियात बालीजवळ ६५ जणांना घेऊन निघालेली फेरीबोट उलटली. या

बंगळूरुतील चेंगराचेंगरीला आरसीबीच जबाबदार

कॅटच्या अहवालातील निरीक्षणात पोलीस दोषमुक्त नवी दिल्ली : ४ जून २०२५ रोजी बंगळूरुत झालेल्या चेंगराचेंगरीला

‘दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागेल’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प-एलन मस्क यांच्यात पुन्हा जुंपली मस्क यांनी पुन्हा एकदा दिला नवीन पक्ष

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही