Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

भरुच येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात ६ ठार

भरुच : गुजरातमधील भरुच येथील दहेज औद्योगिक परिसरात एका रासायनिक कंपनीत पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला.


या भयंकर स्फोटामुळे आजुबाजूच्या परिसर हादरला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व बजाव कार्य सुरु केले. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना घडली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा प्लांटचा स्फोट झाला तेव्हा रिअ‍ॅक्टरजवळ ६ लोक काम करत होते. डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली, त्यात ६ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कारखान्यातील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेले नाही, असे पोलीस अधिक्षक लीना पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment