मुरुड (वार्ताहर) : मुरुड समुद्रकिनारी आज सुमारे तीन फुट लांबीचा कुजलेल्या अवस्थेतील कासव आढळून आले. सदर कासव हा ३० ते ३५ किलो वजनाचा असल्याचा अंदाज वनखात्याने वर्तवला आहे. यापूर्वी अनेक मृत कासव या समुद्र किनारी आढळून आले आहेत.
हा कासव लॉगहेड जातीचा असल्याचे सांगितले आहे. सदर कासव हा कुजलेल्या अवस्थेत असल्या कारणाने त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. लॉगहेड समुद्री कासव, ही सागरी कासवाची एक प्रजाती आहे जी जगभरात पसरलेली आहे. हा एक सागरी सरपटणारा प्राणी आहे, जो चेलोनिडे कुटुंबाशी संबंधित आहे.
पूर्ण वाढ झाल्यावर सरासरी लॉगहेड कासवाची लांबीमध्ये सुमारे ९० सेमीपर्यंत वाढ होते. या वजन १६० किलोपर्यंत असते. लॉगरहेड्स शेकडो मैल समुद्राच्या बाहेर किंवा किनार्यावरील पाण्याच्या खाडी, खारट दलदल, खाड्या, जहाज वाहिन्या आणि मोठ्या नद्यांच्या मुखांमध्ये आढळतात. कोरल रीफ, खडकाळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात सागरी जीव आहेत.