Thursday, December 12, 2024
Homeमहामुंबईसोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या हिंद स्वराज्य संघ यांच्या वतीने लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना मंगळवार १२ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा होईल.

टिळक स्मारक ट्रस्टचे व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि खासदार रजनी पाटील पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.

टिमवि ट्रस्टच्या टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन यावेळी वांगचुक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी टिमविच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक-मोने, टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रमुख व टिमवि ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती टिळक उपस्थित असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -