Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीचाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचा मोठा दिलासा

चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचा मोठा दिलासा

सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन सोडल्या विशेष १४ ट्रेन

मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत म्हणजे एप्रिल-मे दरम्यान दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्याचे थिविम स्थानक यादरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने आगामी काळातील सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष चौदा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

अनेक चाकरमानी कोकणातील आपल्या गावात सहकुटुंब येत असतात. त्यांचा हा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी कोकण कोकण रेल्वे प्रशासनाने चौदा विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान १४ उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्ल्या असून त्या २० एप्रिलपर्यंत धावणार आहेत.

गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ११, १३, १५, १७ आणि १९ एप्रिल रोजी (७ फेऱ्या) रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष गाडी थिविम येथून दिनांक ८, १०, १२, १४, १६, १८ आणि २० एप्रिल रोजी (७ फेऱ्या) थिविम येथून दुपारी ०२.१०. वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजत पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -