Tuesday, April 29, 2025

विशेष लेखराजकीय

कोकणचे भाग्यविधाते!

कोकणचे भाग्यविधाते!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि भौतिक विकासामध्ये अमूल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके दादा केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. नारायणरावजी राणेसाहेब. आजच्या संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याची जगात खऱ्या अर्थाने ओळख आहे ती केवळ कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणेसाहेब यांच्यामुळेच.

त्यांच्या आगमनापूर्वी जिल्हा आणि आजचा संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये आपणास आमूलाग्र बदल झालेला दिसून येईल. सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम आणि डोंगरी जिल्हा असल्याने रस्ता, वीज, पाणी यांसारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होती. आपली जनता सुखी व्हावी, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दादांनी ‘वाडी ते रस्ता’ ही संकल्पना राबविली. वाहतुकीच्या सोयीशिवाय प्रगती होऊ शकत नाही हे त्यांनी जाणले. म्हणूनच आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक वाडीपर्यंत रस्ते पोहोचलेले दिसत आहेत. याचे सारे श्रेय दादांनाच आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरोघरी वीज सुविधा उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने जनतेच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांचे आयुष्य प्रकाशमान केले आहे. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून वाडीवर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे खेड्या-पाड्यांतील पाण्यासाठीची पायपीट थांबलेली दिसून येत आहे, अशा अनेक सोयी-सुविधांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या राहणीमानात बदल झालेला प्रकर्षाने दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्या पर्यटन पर्यटनाच्या माध्यमातून विकास होऊ शकतो, हे सर्व प्रथम जाणले ते दादांनीच. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात दादांचे अमूल्य योगदान आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन लोकांचे दरडोई उत्पन्न वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समुद्र जगाला पाहता यावेत, जिल्ह्यामध्ये देशी-विदेशी पर्यटक यावेत आणि त्यांच्या माध्यमातून पर्यटन विकास व्हावा, यासाठी चिपीसारखे विमानतळ व्हावे ही त्यांची इच्छा. विमानतळाची मुहूर्तमेढ रोवून असे विमानतळ कार्यरत आहे. आज अनेक देशी-विदेशी पर्यटक जिल्ह्यामध्ये सौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत भविष्यामध्ये निश्चितच जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून विकास कसा होऊ शकतो, याची स्वप्ने दादांनी जनतेला दाखविली ती स्वप्ने प्रत्यक्ष प्रत्यक्षात साकारताना आज दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात दादांचे योगदान खूप मोठे आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनीअर होण्याचे स्वप्न बाळगून शिक्षणासाठी बाहेरील मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. सदर शिक्षणासाठी खर्च भरमसाठ येत असे. ही अडचण दादांनी जाणली आणि जिल्ह्यांमध्ये कणकवली येथ तेथे एसएसपीएम इंजिनीअरिंग कॉलेज तसेच पडवे येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्या-पाड्यांतील गरीब हजारो विद्यार्थी इंजिनीअर झालेले आहेत. भविष्यात हजारो विद्यार्थी डॉक्टर होतील. पडवे येथील रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला अत्याधुनिक साधनांचा वापर करून तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा मिळत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कणकवली येथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सुरू करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासामध्ये दादांचे अमूल्य योगदान आहे.

- संजना संदेश सावंत अध्यक्षा, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

Comments
Add Comment